ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वणीचे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी

वणी : विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचे रविवारी रात्री मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नांदेकर यांच्या निधनाने वणी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कणखर नेतृत्व, स्पष्टवक्तेपणा आणि जनतेशी थेट नाते जपणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच आक्रमक भूमिका घेत असत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांना मोठा मान होता.

त्यांच्या निधनामुळे शिवसेनेला (शिंदे गट) मोठी हानी झाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. निधनाची बातमी समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत शोकसंवेदना व्यक्त केल्या.विश्वासभाऊ नांदेकर यांचे पार्थिव वणी येथे आणले जाणार आहे व नांदेकर यांच्या पार्थिवावर पठारपूर येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीय यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर