ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पिसगाव व पहापळ येथील नागरिकांची महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक.

137 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महावितरण कार्यालयात तब्बल पाच तास नागरिकांचा ठिय्या,लेखी आश्वासनावर नंतर मोर्चावर तोडगा.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील पिसगाव व पहापळ येथील नागरीक काल दिनांक 16 जुन 2023 रोज शुक्रवारला रात्री महावितरण कार्यालयावर धडकले.आमच्या परिसरातील गावातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मारेगाव शहरातील वीज पुरवठा तुम्हाला सुरू करता येणार नाही असा आग्रह मोर्चात सहभागी झालेल्या पिसगाव व पहापळ येथील नागरिकांनी धरल्याने काल दिनांक 16 जुन 2023 रोज रात्री शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला.

सदर बाब मारेगांव शहरात माहिती होताच शहरातील अनेक नागरिक त्यांच्या मदतीस महावितरण कार्यालयत पोहचले व तब्बल पाच तास ठिय्या दिला.लेखी आश्वासना नंतर शहर,ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा मध्यरात्रीच्या सुमारास सुरू करण्यात आला.

तालुक्यात काही दिवसा पासून ग्रामीण व शहरी भागात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे.त्या मुळे नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत असून शेतीच्या कामाचा हंगाम सुरू झाला आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतात टोबनी केलेली आहे.सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांन सह गावातील नागरिकांना अनेक अडचणी येत आहे.महावीतरणच नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न जनतेला पडलाय..!

काल तालुक्यातील पिसगाव व पहापळ येथील नागरिक रात्री 12 वाजता महावितरण कार्यालयावर धडकले.जोपर्यंत आमच्या गावातील व परिसराती विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होत नाही.तोपर्यंत मारेगाव शहरातील विद्युत पुरवठा सुरू ठेवता येणार नाही अशी जाचक अट त्यांनी धरल्याने अखेर तेथील अधिकाऱ्यांना मारेगाव शहरातील विद्युत पुरवठा बंद करावा लागला.

या संदर्भात शहरात माहिती मिळताच महावितरण विरोधात शहरातील नागरिकांमध्ये असलेला रोष ग्रामीण भागातील नागरिकांच्या मदतीस असंख्य नागरीकासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी महावितरण कार्यालयावर धडकले.त्या मुळे त्या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.वाढता जनसागर उसळताना बघुन तेथील अधिकाऱ्यांनी शेवटी पोलीस प्रशासनाला पाचारण केले.

महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनावर नंतर या वेळेवरच्या मोर्चावर तोडगा काढण्यात आला.तेंव्हा कुट मध्यरात्री 2 वाजता शहरातील व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर