ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

उद्या पासून सुरु होणार बोरी (गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव..

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

होलिका पर्वावर होणार यात्रेला सुरुवात.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगांव [maregaon] तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथील भव्य यात्रा महोत्सवाला उद्या दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवार पासुन भव्य यात्रेला सुरुवात होत आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या छोट्याश्या नदीत श्री गदाजी महाराज यांचे मंदिर असून धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

धुलीवंदनाच्या दिवसी येथील मंदिराच्या परिसरात सकाळी कबड्डी खेड्ल्या जाते जो गडी शेवटी बाद होतो त्या गाड्याची (मढ) मिरवणुक संपूर्ण गावासभोवती वाज्या गाज्यात काढल्या जाते व त्याला मंदिर परिसरात आणल्या जाते.त्या नंतर प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात.मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात.

तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असुन जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरीऱ्या कडून प्राप्त होते.

उद्या पासुन सुरु होणारी यात्रा हि तिन दिवस असुन या यात्रेचे आयोजन पुढीप्रमाणे करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 7 मार्च 2023 रोजी सकाळी 8 होळकर खेळ (मढ) रंगपंचमी मिरवणुक व त्या नंतर सकाळी 11 वाजता भव्य गोटमार व दुपारी 2 वाजता दहीहंडी आणी गोपाल काला दुपारी 4 वाजता महाराजांच्या पालखीची मिरवणूक आहे….

आणी दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.या दरम्यान यात्रेच्या आयोजनाची तयारी पुर्ण झाली असुन

भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन समस्त ग्रामवासी बोरी, गोटमार खेळाडू बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर