ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

करणवाडी फट्या जवळ आटोचा भीषण अपघात…

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कारणवाडी स्टॉप समोरील यवतमाळ- वणी रोड वरील डिव्हायडर ठरत आहे अपघाताचे मुख्य कारण….



मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की..
करणवाडी फाट्या पासून लागुनच असलेल्या डीव्हायडर जवळ आटो चालकाचे नियंत्रण सुटून आटो पलटी झाल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली असून काही प्रवाशी किर्कोड जखमी तर काही गंभीर जखमी झाले असून कुटलिही जीवित हानी हि झाली नाही.

मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्या जवडील डिव्हायडर ठरत आहे अपघाताचे मुख्य कारण आटोतील प्रवाशी वणी सेवानगर येथील नागरिक आहे पांडवदेवी येथील हेमाळ पंती मंदिर जळका येथे स्वयंपाकासाठी गेल्याची माहिती प्राप्त झाली असून पूजा व जेवणनाच कार्यक्रम करून वणीला परतीच्या वेळेस,ऑटो क्रमांक (MH – 29 m -5795) ने वाणीकडे जात असताना करणवाडी फाट्या पासून जवळच परतीच्या वेळी हा अपघात झाला. असून जखमीवर ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचार सुरु आहे.

यावेळी जखमी मध्ये वंदना गुडघाणे वय 42 वर्ष सुमारे , नीता चांदेकर वय 30 वर्ष, जागेश यादव 42वर्ष , निशा राऊत 30 वर्ष, आर्यन चांदेकर 5 वर्ष , गिरजाबाई भेदुरकर60 वर्ष जोशना डोंगरे28 वर्ष , विकास भेडोळकर 35 वर्ष हे असून या याटो मध्ये बालकाचा सुद्धा समावेश असून सर्व वणी सेवानगर येथिल आहे..

करणवाडी फटया जवळील दिव्हायडर हे गेल्या अनेक दिवसा पासून अपघाताचे कारण ठरत आहे आणि त्यातील मुख्य कारण म्हणजे हाय माक्स लाईट हे शोभेची वस्तू बनून आहे .गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांनी लाईट सुरू करून द्यावा अशी मागणी केली व आंदोलनाचा इशारा दिला आहे या बाबीची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अन्यथा डीव्हायडर कडून टाकावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर