ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

धनंजय मुंडे ‘आत’ माणिकराव कोकाटे ‘बाहेर’?:मुंडे मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याची शक्यता; कोकाटेंचा फोन तूर्त स्वीचऑफ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद जाणारे हे जवळपास निश्चित झाले आहे. या घटनाक्रमामुळे राज्याचे राजकारण तापले असताना आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा एकाद मंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहे. कोकाटेंचे मंत्रिपद गेल्यास त्यांचे पद मुंडेंकडे सोपवण्यात येईल असा दावा केला जात आहे. पण त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाही. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर आज त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाला आणि त्यांना अटक झाली तर त्यांचे मंत्रिपद जाईल. त्यामुळे त्यांचे पद कुणाकडे द्यायचे? या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व सरकारमध्ये धीरगंभीर चर्चा सुरू झाली आहे. कोकाटेंची जबाबदारी कुणाकडे द्यायची? सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे. सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना कोकाटेंकडील जबाबदारी कुणाकडे द्यायची? असा थेट सवाल अजित पवारांना केला आहे. यामुळे अजित पवारांची गोची झाली आहे. पण कोकाटेंची जागा धनंजय मुंडे यांच्या रुपात भरून काढली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली जाईल. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या चौफेर टीकेमुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचे कृषिखाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले होते. पण नंतर कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचे कृषिमंत्रीपद काढून दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले होते. तसेच भरणे यांचे क्रीडामंत्रीपद कोकाटेंकडे सोपवले होते. आता कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आल्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. माणिकराव कोकाटे कॅबिनेटला गैरहजर दुसरीकडे, माणिकराव कोकाटे सध्या नॉट रिचेबल असल्याचीही माहिती समोर आली आहे. आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी त्यांचा मोबाईल फोन बंद लागत आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याची दाट शक्यता आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणींत भर पडली आहे. काँग्रेस नेत्यांवर अवघ्या काही तासांत कारवाई, पण कोकाटेंना अभय उल्लेखनीय बाब म्हणजे माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मंगळवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली. पण विधिमंडळ सचिवालयाने अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याऊलट डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर न्यायालयाने एका सहकारी बँक प्रकरणातील आर्थिक अनियमिततेप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर 24 तासांच्या आत राज्य विधिमंडळ सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्दबातल करण्याची कारवाई केली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर