ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अजित पवारच पुणे जिल्ह्याचे कारभारी:17 पैकी 9 नगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष; शिंदे गटाचे 4, भाजपचे 3 नगराध्यक्ष

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे जिल्ह्यातील 17 नगरपालिकांपैकी 9 नगरपालिकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यामुळे अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे कारभारी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर राज्यातील नगरपंचायती व नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यात. आज झालेल्या मतमोजणीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कोणताही करिश्मा या निवडणुकीत चालला नाही. त्यांना एक आकडी संख्येतच समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपला पुणे व पिंपरी चिंचवडा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले आहे. पुण्याला चिकटून असणारे पिंपरी – चिंचवड हे शहर अजित पवारांचा बालेकिल्ला होता. पण 2017 च्या निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यांनी राष्ट्रवादीची 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडकडे विशेष लक्ष दिले. पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे, पिंपरी – चिंचवड व ग्रामीण पुण्यात जातीने लक्ष घातले. जनसंपर्कावर अधिक भर दिला. त्याचे फळ त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळाले आहे. कोण कुठे झाले विजयी? आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत. तर शिंदे गटाला 4, तर भाजपला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचीच जादू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे, दौंडमध्ये दुर्गादेवी जगदाळे, शिरूर येते ऐश्वर्या पाचरणे, इंदापुरात भरत शाह, जेजुरीत जयदीप बारभाई, भोरमध्ये रामचंद्र आवारे, बारामतीत सचिन सातव, फुरसुंगी येथे संतोष सरोदे व वडगाव मावळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या आंबोली ढोरे विजयी झाल्या. माळेगावात अपक्ष उमेदवाराचा विजय दुसरीकडे, चाकण येथे शिंदे गटाच्या मनीषा गोरे, जुन्नर येते सुजाता काजळे, राजगुरूनगर येते मंगेश गुंडा व मंचर येते राजश्री गांजले विजयी झाल्यात. तर सासवड येथे भाजपच्या आनंदी काकी जगताप, आळंदी येथे प्रशांत कुराडे व तळेगावात संतोष दाभाडे यांचा विजय झाला आहे. माळेगाव नगरपंचायतीत जयश्री तावरे या अपक्ष महिला आमदाराचा विजय झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर