ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

NCP च्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू:मीरा भाईंदर येथील घटना; शिंदे गटाने आईला मुखाग्नि देणाऱ्याला स्मशानभूमीतच दिला एबी फॉर्म

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा – भाईंदर येथील एका उमेदवाराचा निवडणुकीच्या धावपळीत हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आईला मुखाग्नि देणाऱ्या एका उमेदवाराला स्मशानभूमीतच पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. यासाठी मंगळवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यासाठी सर्वच उमेदवाराची चांगलीच दमछाक झाली. मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद पठाण (66) यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास शहरातील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अजित पवारांनी व्यक्त केले दुःख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावेद पठाण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. जनसेवेचं ध्येय मनी बाळगणाऱ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्याचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. मात्र काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मी जावेद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिंदे गटाने स्मशानभूमीतच दिला एबी फॉर्म दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकीच्या रणधुमाळीत मृत्यू झालेल्या आईला मुखाग्नि देणाऱ्या एका उमेदवाराला स्मशानभूमीतच पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची घटना नागपुरात घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिवसेनेने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून योगेश गोन्नाडे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी गोन्नाडे यांच्या आईचे आईचे निधन झाले. मंगळवारी नागपूर येथील एका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत होती. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते थेट स्मशानभूमीत गेले आणि त्यांनी गोन्नाडे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यानंतर योगेश गोन्नाडे यांनी तातडीने निवडणूक कार्यालय गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते चांगलेच भावुक झाले. शिंदे गटाने योगेश यांची कन्या कृतिका गोन्नाडे यांनाही प्रभाग क्रमांक 8 मधून पक्षाची उमेदवारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकरांना भाजपतून विरोध दुसरीकडे, भाजपने मुंबई महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत मोठा असंतोष पसरला आहे. एका इच्छुक महिला उमेदवाराने यासंबंधी तेजस्वी घोसाळकर यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे व्यासपीठावरूनच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण कार्यकर्ता काय असतो? मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मी बोलणार. मी कुणालाही शिवीगाळ किंवा दादागिरी करत नाही. केवळ मनातील भावना व्यक्त करत आहे. भाजपने आमच्याकडून फॉर्म भरून घेण्याची खोटी कारवाई केली, असे या उमेदवाराने म्हटले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर