ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाविरोधात वनविभाग व संस्थेचा जनजागृती उपक्रम

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

केळापूर तालुका प्रतिनिधी सागर मुडे

पांढरकवडा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच वनविभागाच्या वतीने नायलॉन मांजाचा वापर टाळावा, या उद्देशाने पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या माध्यमातून जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झालेले पक्षी, तुटलेली पंखं, रक्तबंबाळ अवस्था तसेच मानवी अपघातांची उदाहरणे प्रत्यक्ष दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. क्षणिक करमणुकीसाठी अनेक निष्पाप जीवांचे प्राण जात असल्याची विदारक वास्तवता यावेळी स्पष्ट करण्यात आली.

उपक्रमादरम्यान “नायलॉन मांजाचा वापर टाळा”, “पर्यावरण वाचवा, जीव वाचवा” असे संदेश देत नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. नायलॉन मांजा हा पर्यावरण व वन्यजीवांसाठी अत्यंत घातक असून त्याच्या वापरावर शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे मकरसंक्रांत साजरी करताना कापसाच्या मांजाचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ. प्रिती तोटावार, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. दुबे, भारत वाघाडे, सुनिता पाटील, मनोरमा घाटोळे, हिंमत सापळे, वनरक्षक आर. एस. सोनी, आर. बी. मानकर, पी. डी. दुधे, एस. बी. शेंडे, वनपाल ए. डी. कुडमेथे, एम. ए. मिंदेवार, ऑपरेटर योगेश जाधव,

वाहनचालक निखिल आगरकर तसेच वनमजूर अंजना नैताम आदी उपस्थित होते.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण झाली असून पर्यावरणसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर