ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

प्रज्ञा सातव आमदार संतोष बांगरांना आव्हान देणार?:भाजपने साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापला, शरद पवार गटाचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माजी आमदार प्रज्ञा सातव यांना पक्षात घेऊन भाजपने आपला मित्रपक्ष असणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा साखरेच्या सुरीने गळा कापल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भविष्यात हिंगोलीत प्रज्ञा सातव ह्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान देताना दिसतील, असा दावा केला आहे. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी भाजप प्रदेश कार्यालय गाठून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला जोरदार झटका बसल्याची चर्चा सुरू आहे. पण आमदार रोहित पवार यांनी हा काँग्रेसला नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेला खरा झटका असल्याचा दावा केला आहे. भाजपने साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापला रोहित पवार म्हणाले, साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपाने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात प्रवेश दिला. यावरून 2029 मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, हे मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय. बाकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव जी सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल, असे ते म्हणालेत. मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची प्रतीक्षा रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे! असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. प्रज्ञा सातवांनी काँग्रेस सोडून चूक केली दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रज्ञा सातव भाजपच्या प्रलोभनाला बळी पडल्याचा आरोप केला आहे. प्रज्ञा सातव या भाजपच्या प्रलोभनाला बळी पडल्या आहेत. माझ्या मते त्यांनी काँग्रेस सोडून मोठी चूक केली आहे. 21 तारखेच्या बैठकीत प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर पक्षात चर्चा केली जाईल. गटबाजी सगळीकडेच असते. त्यामुळे पक्ष सोडायचा नसतो, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर