ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

काँग्रेसमुक्त भारत करताना भाजप काँग्रेसयुक्त झाली:सत्तेतून आमदार खरेदीचा अमित शहांचा ट्रेंड महाराष्ट्रातही, नाना पटोलेंचा घणाघात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेसच्या विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपला सत्तेचा माज आला असून, सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि त्या पैशातून आमदारांची खरेदी, असा नवा ‘आयाम’ आणि अमित शहांचा ट्रेंड भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे,” अशा शब्दांत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर बोलताना पटोले म्हणाले, “भाजप लोकशाही आणि संविधान मानायला तयार नाही. कुणाला पैशांचे तर कुणाला पदाचे प्रलोभन दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा अमित शाह यांच्यापासून सुरू झालेला हा ‘ट्रेंड’ आता महाराष्ट्रातही राबवला जात आहे. प्रज्ञा सातव यांना भाजपने नेमके काय प्रलोभन दिले, हे लवकरच समोर येईलच, पण ही घटना चुकीची आहे.” काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर? प्रज्ञा सातव यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक विधान परिषद आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना पटोले यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या नीतीवर बोट ठेवले. “काँग्रेस आपले नेते सांभाळू शकत नाही, अशी टीका भाजप करत आहे, पण हे त्यांच्या सत्तेच्या माजापोटी येत असलेले बोल आहेत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. भारत काँग्रेसमुक्त करताना भाजप काँग्रेसयुक्त केली काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील त्या काळात काँग्रेसमुक्त भारत करण्याचा प्रण घेतला होता. पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केली. त्यामुळे काँग्रेस कधी संपू शकत नाही. उद्या आम्ही सत्तेत आलो, तर भाजप पूर्ण खाली होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदावरून सुनावले प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हव्या असणाऱ्या विरोधीपक्ष नेते पदावर परिणाम होणार आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, भाजपला विरोधी पक्षनेते पद द्यायचे नव्हते. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि सोडवायचे ही लोकशाहीतील व्यवस्था आहे. पण भाजपला लोकशाही आणि संविधान मान्य नाही. यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील विरोधीपक्ष नेत्याशिवाय चालले. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात विरोधकांचे दोन खासदार असताना विरोधीपक्ष नेतेपद दिले होते. लोकशाहीत सत्तेची आणि विरोधकाची अशी दोन चाके असतात. ही परंपरा भाजपने मोडकळीस काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा प्रश्न नसतो. काँग्रेसने विरोधकांचे दोन आमदार असताना सुद्धा विरोधीपक्ष नेते पद दिले होते. त्यामुळे काँग्रेसने ठेवलेली लोकशाहीची जाण भाजपकडे नाही. त्यामुळे एक आमदार कमी झाला किंवा जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर