ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पालघरच्या बापूगावावर शोककळा:12 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, स्त्रियांचा आक्रोश पाहून काळीज हेलावले; काल झाला होता अपघात

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्या घरात मंगलकार्याची लगबग सुरू होती, जिथे साखरपुड्याच्या गाण्यांचे सूर उमटणार होते, त्याच घरावर आणि संपूर्ण गावावर नियतीने भीषण घाला घातला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर आज बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत रचलेल्या १२ सरणांमुळे संपूर्ण परिसराचे काळीज हेलावले असून, बापूगावात सध्या अक्षरशः स्मशानशांतता पसरली आहे. बापूगाव येथून काल दुपारी ४ वाजता मुलाचे वऱ्हाड एका आयशर ट्रकमध्ये साखरपुड्यासाठी खडकीपाडा येथे जाण्यास निघाले होते. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १०० हून अधिक वऱ्हाडी होते. गप्पा-गोष्टी, मजा-मस्करी आणि उत्साहाच्या वातावरणात सर्व वऱ्हाडी नवरीच्या घराजवळ पोहोचलेच होते. मात्र, युटर्नचा वळसा वाचवण्यासाठी टेम्पो चालकाने वाहन राँग साईडने (विरुद्ध दिशेने) नेल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरची ट्रकला भीषण धडक बसली. या धडकेत ट्रकचा चक्काचूर झाला आणि साखरपुड्याच्या आनंदाचे रूपांतर क्षणात किंकाळ्यांमध्ये झाले. १२ जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार आज लाखनपाडा येथे अंत्यसंस्कारावेळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. हे सर्व १२ जण एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते. एकाच वेळी १२ जणांचे मृतदेह एका रांगेत अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले होते. आपल्या आप्तेष्टांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटले होते. स्त्रियांचा आक्रोश आणि हुंदक्यांनी डोंगर-दऱ्यांचा परिसरही गहिवरला. आज पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले आणि आमदार हरिश्चंद्र भोये या सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी आणि गावात जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. अपघातातील मृतांची नावे शासकीय मदत आणि जखमींचे पालकत्व या अपघातात जखमी झालेल्या १७ जणांवर डहाणूच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या मदतीसाठी आदिवासी विकास विभाग पुढे आला आहे. मंत्री अशोक उईके यांनी माहिती दिली की, जखमींच्या उपचारांची सर्व जबाबदारी आणि त्यांचे पालकत्व आदिवासी विकास विभाग स्वीकारत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी आणि जखमींसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या कुटुंबीयांच्या राहण्याची आणि रुग्णालय ते गाव अशा प्रवासाची पूर्ण व्यवस्था विभागातर्फे केली जाईल. नेमकी चूक कुठे झाली? धानिवरी पुलाजवळ खडकीपाड्याला जाण्यासाठी महामार्गावर साधारण दीड-दोन किलोमीटर पुढे जाऊन युटर्न घ्यावा लागतो. हा वळसा टाळण्यासाठी ट्रक चालकाने पुलाखालून गाडी राँग साईडने नेली. त्याच वेळी समोरून भरधाव वेगात येणारा कंटेनर दुभाजकावर चढून थेट टेम्पोवर कोसळला. अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर नवरीचे घर असतानाच वऱ्हाडींवर काळाने घाला घातला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर