ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

आम्ही बायकांच्या लफड्यात पडत नाही:महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिंदे गटाचा थेट भाजपवर हल्ला: मुख्यमंत्रीही ही रडारवर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. आमच्याकडेही दादा आहेत. पण आम्ही बायकांच्या लफड्यात कधी पडत नाही. आम्ही थेट पुरुषांशी लढतो. फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने यावे लागले. किती वाईट वेळ आहे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. फलटण पालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी दुपारी जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्र पक्षांवर टीका करणे टाळले. पण त्यानंतर सायंकाळी उशिरा झालेल्या एका सभेत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा दाखला देत भाजपवर कडाडून हल्ला चढवला. आमच्याकडे पण दादा आहेत. पण आम्ही बायकांच्या लफड्यात पडत नाही. आम्ही पुरुषांशी लढतो, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख या प्रकरणी अडचणीत आलेल्या भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे. कुठल्या मुलीने, सुनेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात माझे कधी नाव आले नाही. फलटणमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागले. मुख्यमंत्र्यांनाही नाईलाजाने यावे लागले. किती वाईट वेळ. आय लव्ह यू मुख्यमंत्री. मुख्यमंत्री आले म्हणून आम्ही पण चार जण आलो. चारजण कशासाठी असतात? असा सवाल तकर आम्ही खांदेकरी आहोत. राम बोलो भाई राम, बजा दिया काम, असेही गुलाबराव यावेळी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मंत्री शंभूराज देसाईंचाही भाजपवर निशाणा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही यावेळी भाजपला सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, आम्ही शांत असलो तरी कुणी आरे केले तर त्याच्या दहा पट आवाजात कारे करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. फलटणमध्ये काही झाले तर रामराजे तुम्ही नुसती हाक मारा. सगळ्या जिल्ह्यातील शिवसैनिक फलटणमध्ये आणू. शिवसेना कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा. पालकमंत्री दम देत नाही. मात्र, कुणी अंगावर आला तर पाठ दाखवून पळ काढणे, ही शिवसेनेची कार्यपद्धती नाही. दहा पावलं पुढे जाऊन चाल करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, या सभेला रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष पदाचे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर व पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. हे ही वाचा… बड्या उद्योगपतीने फडणवीसांचा केला पंतप्रधान म्हणून उल्लेख:’स्लीप ऑफ टंग’ने स्वतः मुख्यमंत्रीही झाले आश्चर्यचकित; कुठे घडला प्रसंग? काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात नेतृत्व बदल होऊन भाजपचा एक मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे. त्यातच एका बड्या उद्योगपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क पंतप्रधान म्हणून केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात हे भाष्य केले असले तरी त्याची खमंग चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर