ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

रेल्वेलाइन पलीकडील कनेक्शन शहराला जोडा:अंजनगावच्या युवा स्वाभिमान पार्टीचे महावितरणला साकडे, तत्काळ कार्यवाहीची मागणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील रेल्वे लाईन पलीकडील भागाचा वीज पुरवठा ग्रामीण वाहिनीवरून काढून तो तात्काळ अंजनगाव शहराच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावा, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका संघटक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अंजनगाव सुर्जी शहरातील रेल्वे लाईन पलीकडचा भाग हा तांत्रिकदृष्ट्या शहरातच येतो. मात्र, येथील वीज कनेक्शन शहराऐवजी ग्रामीण भागाच्या वीज वाहिनीला जोडण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा किंवा किरकोळ नैसर्गिक आपत्ती आल्यास या भागातील वीज पुरवठा तासनतास खंडित होतो. अंजनगाव शहरात राहूनही केवळ ग्रामीण वाहिनीच्या जोडणीमुळे येथील नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी हे कनेक्शन तातडीने शहर वीज जोडणीला जोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष अमोल कावरे, तालुकाध्यक्ष विठ्ठल ढोले, जिल्हा प्रवक्ता अमोल दाभाडे, तालुका उपाध्यक्ष राहुल रांगोळे, कार्याध्यक्ष राजाभाऊ बहादुरे, अतुल हागोने, मनोज येवले यांसह युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक सक्रिय कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. आता या निवेदनावर वीज मंडळ काय पावले उचलते, याकडे अंजनगाव वासीयांचे लक्ष लागले आहे. ^नागरिक शहरात राहतात, मग वीस ग्रामीण वाहिनीची का ? हा अन्याय तात्काळ दूर करून प्रशासनाने रेल्वे लाईन पलीकडे निघालेल्या शहर वाहिनीशी हा भाग जोडावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. – निलेश देशमुख, तालुका संघटक, युवा स्वाभिमान पार्टी नागरिक शहरात, वीज मात्र ग्रामीणची : आंदोलनाचा इशारा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर