ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मनसे पदाधिकाऱ्याला भरधाव कारची धडक:बदलापुरातील थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, चालक फरार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बदलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी राजेश शेटे यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात शेटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा अपघात रविवारी (७ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास बदलापूर पूर्व येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर घडला. राजेश शेटे हे दुचाकीवरून बिलोली परिसरातून आदर्श नगरच्या दिशेने जात असताना एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शेटे रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. चालक घटनास्थळावरून फरार घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत शेटे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, अपघात घडवून संबंधित कार चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद या अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे वाहनाचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली असून दोषी चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील मोटारसायकलस्वाराचाही जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर