ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संभाजीनगरात MIM उमेदवाराला मारहाण:घटनेचा VIDEO समोर; किराडपुरा भागातील रॅलीत घडली होती घटना, गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका उमेदवाराला दुसऱ्या एका इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण घडल्याची घटना घडली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील किराडपुरा भागात ही घटना घडली. त्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात इच्छुक उमेदवाराचे समर्थक अधिकृत उमेदवाराला मारहाण करताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, एमआयएमने दोन दिवसांपूर्वीच शहरातील 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात प्रभाग क्रमांक 12 मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार मोहमद असरार यांनी शुक्रवारी सायंकाळी किराडपुरा भागात रॅली काढली. यावेळी तिकीट न मिळालेल्या माजी नगरसेविका नसीम बी सांडू खान यांचा मुलगा हाजी इसाक यांचे समर्थक असरार यांच्या रॅलीत पोहोचले. त्यांनी त्यांना उमेदवारीविषयी जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची आणि अखेर हाणामारी झाली. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी गोळा झाली होती. गर्दीतील काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. यामुळे वातावरण शांत झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बहुल भागात एमआयएमची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. येथील अनेक पक्षांनी बंडखोरीच्या भीतीने अद्याप उमेदवारीची घोषणा केली नाही पण एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही उमेदवारांची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नेमकी कशी घडली घटना? प्रभाग क्रमांक 12 क (खुला प्रवर्ग) मधील एमआयएमचे उमेदवार मोहमद असरार यांनी शुक्रवारी किराडपुरा राम मंदिर रोडवरून रॅली काढली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक होते. ही रॅली मंदिरापुढे येताच इच्छुक उमेदवार हाजी इसाक यांचे समर्थक तिथे पोहोचले. त्यांचा चेहरामोहरा पाहून मोहमद असरार आपल्या गळ्यात घातलेल्या हारतुऱ्यासह समोर निघाले. पण हाजी इसाक यांच्या समर्थकांनी त्यांचा मार्ग अडवला. एमआयएमने असरार यांना दिलेल्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी मागणी हाजी इसाक यांच्या समर्थकांनी केली. यावरून त्यांची असरार यांच्या समर्थकांशी बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गट जिन्सी पोलिस ठाण्यात पोहोचले. तिथे अफसर खान हुसेन खान यांच्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गटाने कोणतीही तक्रार दिली नव्हती. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी याची पुष्टी केली आहे. काय म्हणाले इम्तियाज जलील? दुसरीकडे, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, पक्षाचा निर्णय, माझा नाहीपक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी मला उमेदवारी घोषित करण्याचे आदेश दिले. मी त्यानुसार उमेदवारी घोषित करीत आहे. कोणाला उमदेवारी द्यायची हा निर्णय कोअर कमिटी आणि पक्ष ठरवत असतो. उमेदवारी निश्चित करणे हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. काय म्हणाले इच्छुक उमेदवार हाजी इसाक खान? प्रभाग क्रमांक 12 मधील क हा खुला प्रवर्ग आहे. तेथून मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मी संपूर्ण तयारी केली. ऐनवळी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. आता पक्षाने मला ओबीसी महिला प्रवर्गातून लढण्याचा सल्ला दिला. यापूर्वी मी आईला निवडून आणले. आता परत महिला प्रवर्गातून का निवडणूक लढवावी? पक्षाने न्याय द्यावा अशी विनंती मी इम्तियाज जलील यांच्याकडे केली, असे हाजी इसाक खान यांनी याविषयी बोलताना सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर