ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर:तब्बल 7 वर्षे धूळखात पडलेली रोड स्विपर मशीन सुरू, रस्ते धूळमुक्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्नचालू‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकडे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी गेल्या ७ वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडून असलेली नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन (रस्ते साफ करणारे आधुनिक यंत्र) अखेर दुरुस्त करण्यात आली आहे. गुरवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मशिनची पूजा करून ही मशीन पुन्हा एकदा पंढरपूरकरांच्या सेवेत दाखल करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे भाविक, प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांच्या या त्रासाची दखल घेऊन शहर अधिक स्वच्छ आणि धुळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही आधुनिक यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. या मशीनमुळे शहरातील रस्ते चकाचक होण्यास मोठी मदत होणार असून रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि घाण साफ करण्यासाठी हे यंत्र प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रसंगी नगरसेवक सर्वश्री सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, प्रसाद कळसे, अक्षय गंगेकर, लोकेश यादव, विनायक देवमारे यांच्यासह नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ^स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यास प्राधान्य दिले जात आहे.यामुळे शहराच्या स्वच्छता मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. प्रणिता भालके, नगराध्यक्ष, पंढरपूर सुविधा देण्यास प्राधान्य

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर