ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगात 80% रुग्ण व्यसनी:बीडी, माथाडी कामगारांसाठी दंतवैद्यक सरसावले, मोफत मौखिक तपासणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


३१ मे रोजी जगभरात पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक तंबाखूमुक्त दिना’चे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या वतीने शहरात तंबाखूविरोधी व्यापक जनजागृती मोहीम आणि मौखिक कर्करोग (तोंडाचा कॅन्सर) तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. देशातील सुमारे ३० टक्के कर्करोग हे तोंडाशी संबंधित असून, तोंडाच्या कर्करोगाच्या जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये तंबाखू सेवन हेच मुख्य कारण असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ग्रामीण भागात तसेच कामगार वर्गामध्ये गुटखा, तंबाखू आणि सुपारी सेवनाचे प्रमाण अधिक असल्याने हा आरोग्य आणीबाणीचा विषय बनला आहे. या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाजात निर्माण होत असलेल्या गंभीर आरोग्य समस्यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी घातक ठरत आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह तसेच सामाजिक असुरक्षितता निर्माण होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तंबाखू सेवनामुळे तोंडाचा, घशाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, श्वसनाचे आजार, रक्तदाब, दात व हिरड्यांचे गंभीर विकार यांसारख्या अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे दंततज्ज्ञांनी स्पष्ट केले. विशेषतः गुटखा आणि माव्याच्या सतत सेवनामुळे तोंडातील पेशींमध्ये होणारे बदल पुढे जाऊन मौखिक कर्करोगाला कारणीभूत ठरत आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या वतीने यावर्षी विशेष उपक्रम म्हणून बीडी कामगार, माथाडी कामगार तसेच एमआयडीसी परिसरातील कामगारांसाठी विशेष मौखिक कर्करोग तपासणी व तंबाखूमुक्ती जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तंबाखूचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपाययोजना, आरोग्य सल्ला तसेच मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. व्यसन सोडणे हा निरोगी आयुष्याकडे नेणारा निर्णय “तंबाखूचे व्यसन सोडणे हा निरोगी आणि सुरक्षित आयुष्याकडे जाणारा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन ‘आयडीए’ अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. ओंकार भालसिंग यांनी केले. तर संस्थेच्या सचिव डॉ. शिल्पा इनमुलवार यांनी सांगितले की, नियमित तोंड तपासणीमुळे कर्करोगाची लवकर ओळख होऊन जीवितहानी टाळता येऊ शकते. या जनजागृती मोहिमेसाठी इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या आणि जिल्हा दंत वैद्यकीय शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर