ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

पुण्यात राष्ट्रवादीची युती तुटली:165 जागांसाठी महाविकासचा फॉर्म्युला, पण वंचितच्या मागणीने पेच; शिंदे-अजित पवार जवळ येणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचं प्राथमिक सूत्र ठरवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून, त्यापैकी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी प्रत्येकी 50 जागांवर निवडणूक लढवण्यावर तिन्ही पक्षांमध्ये प्राथमिक एकमत झालं आहे. उरलेल्या 15 जागा या वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षासाठी खुल्या ठेवण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी दर्शवली आहे. महाविकास आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी वंचित आणि आपचा समावेश करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. महाविकास आघाडीत नव्या पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न असला, तरी वंचित बहुजन आघाडीने थेट 28 जागांची मागणी केल्यामुळे ही चर्चा सध्या अडचणीत सापडली आहे. वंचितची ही मागणी आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांना मान्य होईल का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही, यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबतही महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मनसेला स्वतंत्र कोटा न देता, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या वाट्यातून काही जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनत चालली आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चर्चा अखेर फिस्कटल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी झालेल्या चर्चांमध्ये अजित पवार गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 30 ते 35 जागा देऊ केल्याची आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढण्याची अट घातल्याची माहिती समोर आली. ही अट शरद पवार गटाला मान्य नसल्यामुळे ही संभाव्य युती तुटली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट विधान अंकुश काकडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चांना वेग पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या वाटेवर जात असतानाच, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे. पुणे महानगरपालिकेत ही नवी युती आकाराला येऊ शकते, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून अजूनही ठोस निर्णय होत नसल्याने, अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्र लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपकडून मानपान नको, मात्र कार्यकर्त्यांचा अपमानही नको, अशी भूमिका आम्ही वरिष्ठांपुढे मांडली असल्याचंही धंगेकर यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळावी, हीच आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं असून, दुपारपर्यंत शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी पुण्याच्या उलट चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून येत आहे. तेथे केवळ निवडणूक चिन्हामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटणार नसल्याचं संकेत मिळाले आहेत. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांनी एक पाऊल मागे घेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हावर लढायचं असेल तर घड्याळाचा आग्रह धरणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. जागावाटपामुळे आघाडी तुटू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी तर थेट विधान करत, अजित पवारांनी जर शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांना माझ्या प्रभागातून उमेदवारी देण्यास सांगितलं, तर मी स्वतः निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं असलं, तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत या चर्चांवर विश्वास ठेवायला अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर