ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बुलढाणा अर्बन पतसंस्था बंद पडण्याच्या अफवा:नागरिकांची शाखांमध्ये गर्दी, संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे स्पष्टीकरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संकटात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी समोर येत या सर्व अफवांचे खंडन केले असून संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचे स्पष्ट केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून नावलौकिक असलेल्या बुलढाणा अर्बन बाबत मराठवाड्यात पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही अनेक सहकारी क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्यात आता बुलढाणा सोसायटीबाबत अफवा उडाल्याने बीड आणि वडवणी सारख्या भागांत नागरिक पहाटेपर्यंत बँकांबाहेर रांगा लावून आपल्या ठेवी काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, या अफवांना कोणताही कायदेशीर किंवा आर्थिक आधार नसून ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे नेमके काय म्हणाले राधेश्याम चांडक? राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून संस्थेचे सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे सुरू आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा अर्बनकडे सध्या सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. याशिवाय संस्थेकडे जवळपास 4 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे सोने सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अफवांचे मूळ: ‘कर्नाटक’ कनेक्शन? संस्थेच्या प्रतिमेला तडा देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे चांडक यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील एका साखर कारखान्याला कर्ज देणे थांबवल्यानंतर काही हितसंबंधी घटकांकडून मुद्दाम अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा चांडक यांनी केला. संस्थेची प्रतिमा मलीन करणे आणि ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करणे हा या अफवांचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले केले. मात्र बुलढाणा अर्बनचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक धोरण आणि भक्कम मालमत्ता पाहता अशा अफवांचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास राधेशाम चांडक यांनी व्यक्त केला. सर्व व्यवहार सुरळीत; घाबरू नका बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांमधील व्यवहार नियमितपणे आणि पारदर्शकपणे सुरू आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास ठेवून धावपळ करू नका असे सांगितले आहे. संस्थेची दीर्घकालीन विश्वासार्हता आणि गुंतवणूक धोरण पाहता, अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर