ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की नोटीस का येते?:विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाचा चमचा असतो!, संजय राऊत यांचा हल्लाबोल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वैभव नाईक यांची चौकशी गेली अनेक वर्षे सुरू आहे. नेमके ही चौकशी का सुरू आहे? त्या चौकशीला काही दिशा नाही. वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की त्यांना नोटीस दिली जाते. आम्हालाही तशा नोटीस येत असतात, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे की केवळ विरोधकांनाच का नोटीस दिली जाते, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, देशभरात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या ही भाजपचीच मागणी आहे, तसे झाले पाहिजे. विधान परिषदेसारखी निवडणूक ओपन मतदानाने झाली पाहिजे. तर दुसरीकडे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हे राजकीय पक्षाचा चमचा असतो त्यांच्याकडे पक्षांतर बंदी संदर्भात काहीही अधिकार नसले पाहिजे कारण तो सुद्धा कोणत्या तरी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेला असतो. तोच पक्ष त्यांना विधानसभेचा अध्यक्ष करतो. म्हणून विमानतळावर युनियन हवी होती संजय राऊत म्हणाले की, मुंबई विमानतळावर वर्षानुवर्षे शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेना मजबुतीने काम करत असताना तिथे भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी दादागिरी करून आणि धमक्या देऊन स्वतःची युनियन घुसवायचा प्रयत्न केला. विमानतळावरील सोने तस्करी आणि चोरीवर स्वतःचा ताबा राहावा म्हणूनच भाजपला तिथे आपली युनियन हवी होती. काल झालेल्या कारवाईत रवींद्र चव्हाणांचे ‘डावे-उजवे’ मानले जाणारे लोकच थेट तस्करी करताना पकडले गेले आहेत. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला संजय राऊत म्हणाले की, पैसे देऊन जर माणसं फोडली जात नाही, घोडेबाजार केला जात नाही तर 50 खोके काय होते? इतके प्रेमाने 50 कोटी देणार असतील तर सर्वांना असे पैसे वाटले पाहिजे. केवळ सोबत येणाऱ्या आमदारांना का पैसे दिले जातात. गरीबांना पैसे दिले पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला हे खरे आहे. त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च झाला आहे. हे पैसे आले कुठून हे फडणवीस, बावनकुळे आणि शिंदे गटाला सुद्धा माहिती आहे. 11 प्रमुख शहरांमध्ये मोठे आंदोलन संजय राऊत म्हणाले की, आज विद्यार्थ्यी आणि तरुणांना आंदोलन करावे लागत आहे कारण नीट पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्या राज्यामध्ये नीट पेपरफुटीचे केंद्र आहे, जे पकडले गेले ते सर्व जण भाजपशी निगडीत आहेत. त्यामुळे कॉकरोच पार्टीला समर्थन मिळाले नाही असे कोण म्हणाले देशभरातील 11 प्रमुख शहरांमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले, त्यांच्यावर अश्रूधुराचे फवारे सोडण्यात आले, हे आंदोलन काँग्रेस करत होते. म्हणून कॉकरोच जनता पार्टीला आंदोलनाला परवानगी दिली. सुर्यकांत यांच्यामुळेच जनता कॉकरोच पार्टी संजय राऊत म्हणाले की, भाजप समर्थक सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्यामुळेच जनता कॉकरोच पार्टी सुरू झाली. त्यांनी बरोजगार तरुणांना झुरळ म्हटल्याने हे आंदोलन सुरू झाले. त्यांचा आणि इतर कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मनात याबद्दल भीती आहे. काल यासंदर्भात मोठी आंदोलने देशभरात झाली आहे. याकडे सत्ताधाऱ्यांनी पहावे, कॉकरोचकडे नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर