ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत सोमवारनंतर पारा 2 ते 3 घटणार:मराठवाड्यासह राज्यात पुढील 2 दिवस ढगांचे, नंतर थंडी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठवाड्यासह राज्यात पुढील ४ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर कमी झाला आहे. पण पुढील ५ दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी तापमानात २ ते ३ अंशांची घट पाहायला मिळू शकेल. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे चक्रीवादळासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याने ढगाळ हवामान तयार झाले आहे. परिणामी, किमान तापमान वाढल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्यानंतर तापमानात काही अंशी घट शक्य आहे. हवामान विभागाच्या संकेतस्थळानुसार, छत्रपती संभाजीनगरचे तापमान सध्या १४.६ अंशावर असलेले तापमान, ५,६ तारखेला १३ अंशावर व त्यानंतर ११ अंशावर येण्याचा अंदाज आहे. सोलापूरमध्ये सध्या १९.५ अंशावरील तापमान, पुढे १८ ते १७ अंशावर येईल. अशीच स्थिती इतर ठिकाणीही सरासरीने कायम राहणार आहे. मराठवाड्यात ८ जानेवारीपर्यंत तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचीही शक्यता आहे. किमान तापमानात घट, कमाल कायम पुढील चार -पाच दिवस मराठवाड्यातील किमान तापमानात घट पाहायला मिळणार आहे. तर कमाल तापमान २४° ते २६° अंशाहून अधिक राहिल. – डॉ. कैलास डाखोरे, हवामान शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ, परभणी उत्तरेत पुन्हा थंडीची लाट गत काही दिवसांत खंडित झालेली उत्तरेकडील शीतलहर जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे पुन्हा सक्रिय झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात तीव्र थंडीची लाट तसेच धुके पसरले आहे. तेथेही पुढील चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा राज्यात सध्या तीव्र थंडीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तरेतील थंडीची लाट महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हटताच पुन्हा थंडीचा जोर वाढवण्यास कारणीभूत ठरेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर