बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे. याबाबत लाईव्ह अपडेट खाली पहा…..