ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार:राऊत म्हणजे नव्या काळातील ‘भोंदू बाबा’, MLC साठी सोनिया गांधींना मुजरा करावा लागेल- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू बाबा अशोक खरातनंतर आता संजूबाबा राऊत ने नवा धंदा उघडला आहे. जसा खरात लोकांना फसवायचा तसे राऊत भविष्यवाणी सांगत लोकांना फसवण्याचे काम करत आहे.कोणाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीत राऊत यांनी जाऊ नये, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्यांची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व आहे ते लोकांमधून निवडून आलेले आहेत. खरात सारखे संजूबाबा राऊत हे दुसरे दुकान मांडत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीतून दिला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी सुनेत्रा अजित पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता कोर्ट काय निर्णय देईल तो नक्की देईल. उबाठा गटाचा शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर हक्क उरला नाही हे आता सिद्ध झाले आहे. तुम्ही हरामशास्त्री अन् कामशास्त्री नवनाथ बन म्हणाले की, कोण रामशास्त्री आहे आणि कोण कामशास्त्री आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. कारण संजय राऊत आणि उबाठा गट स्वत: हरामशास्त्री आहेत. कामशास्त्रांत तर त्यांची पीएचडी झाली आहे. अलिबागच्या बंगल्यात तुम्ही काय पीएचडी करता हे जनतेने पाहिले आहे. तिथले काळे कारनामे समोर आले तर तुम्हाला जनतेच्या समोर जाता येणार नाही. तुम्ही हरामशास्त्री आणि कामशास्त्री आहात. .. काँग्रेसच्या उपकारावर आमदारकी नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात जावे असे संजय राऊत यांना वाटते आहे. पण जनतेने तुम्हाला नाकारले आहे. उद्धव ठाकरे विधीमंडळात जाणार का नाही, त्यांना संधी मिळणार का नाही हे तुमच्या हातात नाही तर काँग्रेस ठरवणार आहे. काँग्रेसने उपकार केले त्यांनी आशीर्वाद दिले तरच उद्धव ठाकरेंना विधीमंडळात जाता येणार आहे. एक काळ होता शिवसेनेला स्वाभिमान होता. आता आमदारकीसाठी सोनिया गांधीसमोर मुजरा करावा लागणार आहे. ..देवाभाऊंनी काय बोलावे हे राऊतांनी सांगू नये नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलावे हे संजय राऊत यांनी सांगू नये. शिवरायांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांना काही सल्ले देऊ नये. सौदेबाजीची भाषा तर तुम्ही करूच नये. कारण तुम्ही सौदेबाजी करत पक्ष काँग्रेसला विकला, हिंदूत्व सोडले. यामध्ये राऊतांना राज्यसभेची पुन्हा संधी मिळावी हे तुमचे डील राहुल गांधीसोबत सुरू आहे. देवाभाऊ जनतेमधून निवडून आले आहेत, ते मागच्या दाराने राजकारण करत नाही. त्यांनी काय बोलावे हे राऊतांनी सांगायची गरज नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर