ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अंबादास दानवेंचा घाटी अधिष्ठाता डॉ. सुक्रेवर गंभीर आरोप:उमेदवारांना धमकी दिल्याचा दावा, निवडणूक आयोगाकडे निलंबनाची मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. सुक्रे उमेदवारांना धमकावत असल्याचा दावा करत दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दानवे राजकीय आखाड्यात अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत होते. यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर देताना दानवे यांनी थेट डॉ. शिवाजी सुक्रे यांचे नाव घेतले. डॉक्टरांच्या वेशभूषेत राजकीय सौदेबाजी करत असल्याचा आणि उमेदवारांना फोन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दानवे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. सुक्रे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराला फोन करून ‘कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस, उमेदवारी मागे घेऊन टाक’ असे म्हटले आहे. ही बाब निवडणूक आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन असल्याचे दानवे यांनी नमूद केले. पत्रात पुढे असेही म्हटले आहे की, डॉ. शिवाजी सुक्रे यांची अधिष्ठाता पदावरील नियुक्ती केवळ २२ जून २०२४ पर्यंतच वैध होती, तरीही ते अजूनही पदावर कायम आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) देखील त्यांच्या या ‘बेकायदेशीर नियुक्ती’ची दखल घेतली होती. पालकमंत्री संजय शिरसाट यांची बाजू घेऊन डॉ. सुक्रे पदावर कायम राहिल्याची परतफेड करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल या प्रकरणी दानवे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर