ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शहराच्या पाणी योजनेची फाइल 2.5 वर्षे कमिशनसाठी मातोश्रीवर- सावे:उद्धव ठाकरेंमुळे शहराला विलंबाने पाणी मिळत असल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरासाठी केवळ ५५ दिवसांत २०१९ मध्ये १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. निविदा प्रक्रिया अंतिम होऊन कार्यारंभ आदेशही मिळाले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टक्केवारीसाठी फाइल मातोश्रीवर अडीच वर्षे प्रलंबित ठेवली. पाणीपुरवठा विभाग, पालकमंत्री ते मातोश्री अशी फाइल फिरत राहिली. अडीच वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित राहिल्याने शहराला पाणी मिळू शकले नाही, असा आरोप राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला. भाजप-शिवसेना युतीचे सरकार २०२२ मध्ये आल्यानंतर नव्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली. केंद्राचा एक हजार कोटींचा हिस्सा प्राप्त झाल्याने आता २७४० कोटींवर योजना गेल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहराला तीन महिन्यांत पाणी मिळणार असल्याचा पुनरुच्चारही केला. ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित “नेताजी इन न्यूजरूम’ कार्यक्रमात अतुल सावे यांनी शनिवारी (१० जानेवारी) हजेरी लावली. विधानसभा निवडणूक २०१९ नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर थांबवली. संपलेली पाणीपुरवठा योजना फडणवीस यांनी पुन्हा सरकार आल्यानंतर नव्याने बैठक घेत युद्धपातळीवर सुरू केली. आता योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ३७०० हॉर्स पॉवरची चाचणी यशस्वी झाली. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहरासाठी ६५० कोटींचे रस्ते, २३० कोटी कचरा नियोजन आणि २७४० कोटी पाण्यासाठी प्राप्त झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर