ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भाजप हा खाणाऱ्यांचा अन् बलात्काऱ्यांचा पक्ष:घरातील मुली सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला मतदान करून नका, आंबेडकरांचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी शनिवारी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा आतापर्यंत केवळ खाणाऱ्यांचा पक्ष होता. तो आता बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. या पक्षाने बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवकपद दिले आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका, असे ते म्हणालेत. बदलापूर येथील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अक्षय शिंदेसह तुषार आपटेवर गुन्हा दाखल केला होता. पण आता भाजपने या तुषार आपटेलाच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर आपटेने आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी भाजपच्या मतदारांना आपल्या कुटुंबातील मुले, मुली सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग निवडला प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप व संघाच्या लोकांना आपल्या कुटुंबातील मुले व मुली शाबूत ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका. कारण, बदलापूरमध्ये जे कांड झाले होते, त्यातील सूत्रधाराला भाजपने स्वीकृत नगरसेवकाचे पद दिले आहे. भाजप हा आतापर्यंत खाणाऱ्यांचा पक्ष होता, पण आता तो बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता भाजप प्रतिष्ठित नागरीक म्हणून आपल्या पक्षात स्थान देत आहे. भाजप व संघाने हा व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. हे थांबवायचे असेल तर संघ व भाजपच्या ज्या लोकांना आपले कुटुंब सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर त्यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करू नये. भाजपचे हे जे नवीन कॅरेक्टर उभे राहत आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. या कॅरेक्टरला बदलायचे असेल तर भाजप व संघाला मतदान करणारा मतदारच ते बदलू शकतो. मी या सर्वांना आवाहन करतो की, मतभेद निश्चितपणे आहेत. टोकाचे मतभेद आहेत. पण केवळ मतभेद आहेत म्हणून आम्ही व्यभिचाराचा मार्ग अवलंबलेला नाही. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. ते थांबवणे आमच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे. हे थांबवायचे असेल तर या महापालिका निवडणुकीत भाजप व संघाच्या मतदारांनी भाजपला मतदान करू नये. हे केले तर तुमच्या नेतृत्वाला योग्य तो संदेश मिळेल. भ्रष्टाचारी व बलात्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही हा संदेश देऊन तुम्ही आपला पक्ष वाचवा असे मी आवाहन करतो, असे प्रकाश आंबेडकर संघ व भाजपच्या मतदारांना आवाहन करताना म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर