ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

काँग्रेसची हिंगोलीत आढावा बैठक संपन्न:आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय काँग्रेस समितीच्या बैठकीत शनिवारी ता. १० घेण्यात आला आहे. त्यासाठी बुथसमित्या, गटनिहाय समित्यांकडे लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. तर पक्ष सोडलेल्यांचा विषय काढून विाकारण त्यांना मोठे करू नका असेही यावेळी नेत्यांनी सांगितले. हिंगोली येथील सराफ ब्लँक्वेट हॉल येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाच्या अखील भारतीय काँग्रेस समितीच्या पदाधिकारी तथा मराठवाडा सह प्रभारी रेहाना चिश्‍ती, मलंग शेख, जिल्हा प्रभारी कल्याण दळे, सहप्रभारी साहेबराव कांबळे, नागसेन बिरजे, जिल्हाद्यक्ष सुरेश सराफ, विनायक देशमुख, डॉ. सतीष पाचपुते, गजानन देशमुख, डॉ. रमेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर ठिक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचेही ठरविण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वबळाचा नारा दिला. हिंगोली जिल्हयात कोणाच्याही पक्षातून बाहेर जाण्याने पक्षाचे नुकसान झाले नाही. ज्यांना काँग्रेसने मोेठे केले त्यांनी पक्ष सोडला. मात्र आता पक्ष सोडणाऱ्यांचे नांव घेऊन विनाकारण मोठे करू नका असेही नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात जिल्हयात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बुथ समित्या, जिल्हा परिषद गटनिहाय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनसंपर्क वाढविण्याचा निर्णय यावेळी घेेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नांव बदलू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणा यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर