ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला:एक मे पासून राज्यात मोहिम, समिती स्थापन; चालकांना अप्रत्यक्षपणे 6 महिन्यांची मुदत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 1 मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चालक संघटनांकडून ४ मे रोजी संपाचा इशारा देण्यात आला होता. या तणावपूर्ण परिस्थितीत मंत्री सरनाईक यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीतून काही महत्त्वाचे निर्णय पुढे आले. या चर्चेनंतर सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, मराठी भाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे आणि चालकांनी मराठी शिकण्याची तयारीही दर्शवली आहे. मात्र, नियमभंग, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे किंवा प्रवाशांची फसवणूक यांसारख्या प्रकारांवर परिवहन विभाग कठोर कारवाई करणार आहे. अशा प्रकरणांमध्ये चालकांचे परवाने रद्द करण्याचा अधिकार विभागाकडे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. मात्र, केवळ मराठी न येण्यावरून तत्काळ कारवाई केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी काहीसा दिलासाही दिला. ऑटोरिक्षा चालकांसाठी मराठी हे पुस्तक वितरण दरम्यान, चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. आरटीओ कार्यालयांमध्ये चालकांना मराठी शिकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ऑटोरिक्षा चालकांसाठी मराठी, ही पुस्तिका देखील वितरित केली जाणार आहे. याआधी 2019 मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार 2020 साली ही पुस्तिका तयार करण्यात आली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली. यामुळे चालकांना व्यवहारातील मराठी सहज शिकता येईल, असा सरकारचा विश्वास आहे. आरटीओ कार्यालयांना स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र हे रोजगारनिर्मिती करणारे राज्य आहे, मात्र त्याचबरोबर मराठी भाषेचा वापर वाढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी मराठीत संवाद साधणे अपेक्षित आहे. राज्यातील सर्व 59 आरटीओ कार्यालयांना या मोहिमेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ही मोहीम थांबवली जाणार नाही, तर सातत्याने राबवली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द तथापि, या निर्णयात एक महत्त्वाचा बदल म्हणजे मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवाने रद्द केले जाऊ शकतात. यामुळे सरकारने एकीकडे कडक भूमिका घेतली असली, तरी दुसरीकडे व्यवहार्य दृष्टिकोन ठेवत चालकांना वेळ देण्याचा प्रयत्न केला आहे. 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत माहिम याशिवाय, 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक आरटीओ कार्यालयाने समिती स्थापन करून कोणत्या चालकांना मराठी येत नाही, याची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेतून पुढील धोरण ठरवले जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी सरकारने ‘मराठी शिकवा, पण दबाव टाकू नका’ अशी संतुलित भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर