ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा निर्णय:अंशकालीन महिला परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ, दरमहा मिळणार 6 हजार रुपये

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून 6 हजार रुपये मानधन मिळणार आहे. राज्यातील आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन महिला परिचर गाव पातळीवर, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात प्राथमिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. तसेच आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यातही त्या महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संघटना कडूनही होत होती. या परिचरांना 2019 च्या शासन निर्णयानुसार दरमहा 3 हजार रुपये मानधन अदा करण्यात येत होते. महिला परिचरांच्या कामाचे बदलते स्वरूप, आरोग्य सेवेतील वाढती भूमिका आणि वाढत्या महागाईचा विचार करता आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन महिला परिचरांच्या मासिक मानधनात 3 हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता त्यांना सध्याचे तीन हजार आणि प्रस्तावित वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मासिक मानधन 1 एप्रिल 2026 पासून देण्यात येणार आहे. सर्व जिल्हा परिषदांनी अंशकालीन महिला परिचरांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मासिक मानधन देण्याची कार्यवाही करावी. तसेच दरमहा 10 तारखेपर्यंत मासिक मानधनाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन महिला परिचर यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर