ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सगणापूर येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते विकासकामांचा दुहेरी सोहळा

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे आज दि. १६ जानेवारी रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजयभाऊ देरकर यांच्या शुभहस्ते गावातील नूतन सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण तसेच ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत नव्या ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

या विकासकामांच्या दुहेरी सोहळ्यामुळे सगणापूर गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमास मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. भिमराव व्हनखंडे, कृषी विस्तार अधिकारी श्री. संदीप वाघमारे, सगणापूरचे सरपंच श्री. दादाराव टेकाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी आमदार संजयभाऊ देरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सार्वजनिक वाचनालयामुळे गावातील विद्यार्थ्यांना व तरुणांना ज्ञानसंपदेचा लाभ होईल. तर नवीन ग्रामपंचायत भवनामुळे प्रशासन अधिक सक्षम होऊन ग्रामविकासाला गती मिळेल. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

कार्यक्रमास उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगणापूरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमांचे ग्रामस्थांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर