ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

आपटी येथील 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– तरुण युवकाच्या आत्महत्येने समाजमन सुन्न.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यात :-एकामागोमाग होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र संपतांना दिसत नाही.काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा आज आत्महत्या झाल्याने तालुका पुरता हादरून गेलेला आहे.

आज दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोज गुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असुन शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रज्वल मोहन बोढे वय अंदाजे 20 वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन तो मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आपटी येथील रहिवासी असून प्रज्वलच्या नावावर 7 एकर शेती असल्याचे समजते.आणि तो वरोरा येथे बी.कॉम.पहिल्या वर्षाला शिकत होता.तो नेहमीप्रमाणे वरोरा येथून आला.आणि आपल्या घरी आतमध्ये गेला.आईवडिलांना वाटले की तो आराम करीत असेल.पण थोडया वेळाने जाऊन बघीतले असता प्रज्वलणे घरी पंख्यासाठी स्लॅबला असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. प्रज्वलला लटकलेले पाहताच प्रथम घरच्यांना विश्वासच बसला नाही.अभ्यासात हुशार असलेल्या प्रज्वलला हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली हे मात्र समजण्यापलीकडे आहे.प्रज्वलच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे.प्रज्वल याचे पश्चात आई वडील आणि एक बहीण असा आप्त परिवार आहे.मृत प्रज्वल याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने आपटी व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर