ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

भाजपच्या कथनी अन् करणीत फरक:मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर 5 महिला नेत्या, पण एकीलाही बोलण्याची संधी नाही; काँग्रेसची टीका

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर 70 कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कथनी अन् करणीत फरक आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला 5 महिला नेत्या हजर होत्या. पण त्यापैकी एकाही महिलेला बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रृणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत जोरदार पलटवार केला. महिलांची उपस्थिती केवळ दिखाऊपणाची विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपची कथनी आणि करनी. भाजपचा महिलांबाबत कळवळा किती दिखाऊ स्वरूपाचा आहे हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले. मंचावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री, विधान परिषदेच्या महिला उपसभापती, राज्यसभेच्या महिला खासदार, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उपस्थित असताना बोललं कोण? केवळ देवेंद्र फडणवीस… मंचावर बसलेल्या एकाही महिलेला बोलण्याची संधी नाही, केवळ दिखाऊ उपस्थिती.
केंद्र व राज्यात महिलांना केवळ 10 टक्के प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व आहे केवळ 10%, राज्याचे मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व आहे केवळ 10%. भारतीय जनता पक्षाची महिला सबलीकरणाची भावना खरोखर शुद्ध असेल तर तातडीने मंत्रिमंडळात फेरबदल करून महिलांना 33% आरक्षण द्यावे, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी या प्रकरणी भाजपला दिले. मोदींचे भाषण आचारसंहिता भंग करणारे उल्लेखनीय बाब म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी रविवारी महिला आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आचारसंहितेचा भंग असल्याचाही आरोप केला होता. ते म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी 50 हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर