ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

एनसीआरबी:डिजिटल अरेस्टमधून 1 वर्षात भामट्यांनी 1.23 लाख जणांचे 1,935 कोटी लुटले; महाराष्ट्र 11,073 गुन्ह्यांनी देशात तिसऱ्या स्थानी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतात डिजिटल अरेस्टचे २०२३ मध्ये ६०,६७६ गुन्हे दाखल होते. त्यात १०४ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ दरम्यान १,२३,६७२ गुन्हे घडले. मात्र फक्त १०,५९९ आरोपींनाच अटक झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा(एनसीआरबी)वार्षिक अहवाल मे-२०२६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातून हे स्पष्ट झाले. या अरेस्टमधून १,९३५ कोटींची लूट भामट्यांनी केली आहे. २०२३ मध्ये लुटीची रक्कम ३३९ कोटी होती. म्हणजे एका वर्षात लुटीच्या रकमेत ५ पट वाढ झाली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र ११,०७३ गुन्ह्यांसह तेलंगण, कर्नाटकनंतर देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भामट्यांचे मोबाइल केले ब्लॉक फसवणुकीसाठी वापरलेले ९.४२ लाख सिमकार्ड आणि २.६३ लाख मोबाइल ब्लॉक केले आहेत. ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग’ प्रणालीमुळे ५,४८९ कोटी रुपये वाचवले आहेत. गुन्हे वाढण्याची ३ कारणे 1 एआयचा गैरवापर : डीपफेक व्हॉइस, फेक व्हिडिओ कॉल, एआयने फ्रॉड डॉक्युमेंट्स निर्माण करतात.
2 सवयीचा अभाव : यूपीआयद्वारे लुटणे, इंटरनेट बँकिंगची ज्येष्ठांना माहिती नसल्याने प्रकार होतात.
3 जागरूकतेचा अभाव: ज्येष्ठांना टार्गेट करतात कारण त्यांना माहिती नसते. तेलंगण अव्वल: २०२४ : तेलंगणात २७,२३० गुन्हे घडलेत. कर्नाटकात २१,९९३, महाराष्ट्रात ११,०७३ गुन्हे घडले. महाराष्ट्र ५ राज्यांत तिसऱ्या स्थानी. पुण्याला ४८७ वरून १,५०४ थेट गुन्हे घडले. पुण्यात एकाच वर्षात ४५० कोटी रुपये गमवावे लागले आहे. पद्धत : आरोपी स्वत:ला सीबीआय, ईडी किंवा पोलिस अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे पीडितांना घरातच ‘कैद’ करतात आणि अटकेची भीती दाखवून लाखोंची खंडणी उकळतात. व्हॉट्सॲप सेटिंग बदला : डिजिटल अरेस्ट, सेक्सॉर्टशन व्हिडिओ कॉल्स टाळण्यासाठी व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये हे बदल करा. १. व्हॉट्सॲप सेटिंगमधील प्रायव्हसीला टॅब करा. २. कॉल्सला सायलेन्स अननोन कॉलर्स ही सेटिंग अनेबल (सुरू) करा. ३. यामुळे कॉन्टॅक्ट लिस्ट बाहेरील कॉल घेता येणार नाहीत. १९३० या टोल फ्री क्रमांकावर फोन करून संपूर्ण माहिती द्यावी. परदेशातून सूत्रे भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या विश्लेषणानुसार, डिजिटल अरेस्टचे ४५-४६% गुन्हे कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि थायलंड यांसारख्या आशियाई देशांतून होतात. तीन वर्षांत फसवणुकीत झपाट्याने वाढ
वर्ष नोंदवलेले गुन्हे आर्थिक नुकसान
२०२२ ३९,९२५ ९१ कोटी रुपये
२०२३ ६०,६७६ ३३९ कोटी रुपये
२०२४ १,२३,६७२ १,९३५ कोटी रुपये डिजिटल अरेस्ट : गुन्ह्यांचा महापूर (२०२३ विरुद्ध २०२४)
तपशील वर्ष २०२३ वर्ष २०२४ वाढ
नोंदवलेले गुन्हे ६०,६७६ १,२३,६७२ १०४% वाढ
फसवणुकीची रक्कम ₹३३९ कोटी ₹१,९३५ कोटी ४७१% वाढ
सरासरी प्रतिव्यक्ती नुकसान ₹५६,००० ₹१,५६,५०२ १७९% वाढ
2 सवयीचा अभाव : यूपीआयद्वारे लुटणे, इंटरनेट बँकिंगची ज्येष्ठांना माहिती नसल्याने प्रकार होतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर