ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक:शिंदे गटाच्या पराभूत उमेदवारासह अनेकांवर गुन्हा दाखल

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधी नगर भागात राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांनी सज्ज झालेल्या टोळक्याने जोरदार दगडफेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढवत होते. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप करत मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी जुन्या वादातून आणि निवडणुकीतील पराभवाच्या संतापातून बंटी चावरिया यांच्या घराला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय हा संपूर्ण हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओमध्ये काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराच्या दिशेने दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून उभ्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 14 जणांवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे. बंटी चावरिया यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लू चावरिया यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात दंगल घडवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावणे या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी गांधी नगर परिसरात बंदोबस्त वाढवला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. अकोटमध्ये पराभवाच्या रागातून विजयी उमेदवारावर ‎जीवघेणा हल्ला मनपा निवडणुकीत भाजपच्या ‎‎नवनिर्वाचित नगरसेवकावर ‎प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ‎‎अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री ‎‎नऊच्या सुमारास घडली. शरद‎ श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या ‎‎नगरसेवकाचे नाव आहे. या भागात ‎‎तोडफोड देखील झाली. पोलिसांनी‎ सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे ‎‎शहरात मोठी खळबळ उडाली.‎ जखमी नगरसेवकाला रुग्णालयात ‎‎दाखल करण्यात आले असून‎ उपचार सुरू आहेत.‎ शहरातील प्रभाग क्रमांक 2 ‘ब’‎मधील भाजपचे विजयी उमेदवार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा‎ चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग 2 ‘ड’‎गटातील पराभूत उमेदवार नितीन‎ राऊत आणि समर्थकांनी हल्ला ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎केल्याचे सांगण्यात येत आहे.‎ दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या‎ तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य ‎लाठीमार केला.निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे. अकोट फैल भागात‎ भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार ‎गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला.‎ वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर