ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अंबाड्यातून 1.39 लाखांचे ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त:विक्रीसाठी आणल्याचे आले समोर, एकावर गुन्हा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची साठवणूक करून ती शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री करणाऱ्या अंबाडा येथील एकावर कृषी विभाग आणि मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ८६ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, सुमारे १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई २६ जूनला सायंकाळी करण्यात आली. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथे एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मोर्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्याकडे पोलिस मदतीची मागणी केली. यानंतर तालुका कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक दिनेश चौधरी, सहाय्यक कृषी अधिकारी मनीष काळे, मनोज लंगोटे तसेच अंबाडा बीटचे मंगेश बदुकले यांनी संयुक्तपणे मोहम्मद अफजल जाफर खान अहमदखान (रा. अंबाडा) यांच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान घरातून एकूण ८६ एचटीबिटी बियाण्यांची पाकिटे आढळून आली. ही सर्व पाकिटे जप्त करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी दिनेश चौधरी यांच्या तक्रारीवरून मोहम्मद अफजल जाफर खान अहमद खानविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपीकडे बियाणे साठवणुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर