ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नाशिकमध्ये ‘महायुती’तील मित्रपक्षांत ठिणगी:पराभूत भाजप उमेदवाराचे घर जाळण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नगरसेविकेवर गुन्हा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राजकीय वादाच्या घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करताना एका भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी भव्य रॅली काढत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या पराभूत उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुष्पा ताजनपुरे यांच्या दाव्यानुसार, विजयाची रॅली काढत असताना नवले यांच्या कार्यकर्त्यांनी ताजनपुरे यांच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले आणि घरावर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले, त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह १५ ते २० संशयित समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. एकटी लढली अन् जिंकली, आभा पांडेंचे शक्तीप्रदर्शन नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी, प्रभाग २१ मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी पक्षाची अब्रू राखली आहे. आज त्यांनी शांती नगर परिसरातून भव्य ‘आभार रॅली’ काढून मतदारांचे आभार मानले. रॅली दरम्यान बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, “माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषक कार्ड आणि पैशांचा वारेमाप वापर केला होता. मात्र, जनतेने माझ्या कामावर विश्वास दाखवला. अजित पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, तो मी सार्थ ठरवला आहे. आता यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध राहीन.” निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग लावल्याची घटना समोर आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवल्याचा आरोप आकाश बारणे यांनी केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर