ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

‘जागतिक कंपन्या इतर राज्यांकडे, महाराष्ट्राचे काय?’:कागदी करार नको, प्रत्यक्ष गुंतवणूक हवी, गुंतवणुकीच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मोठ्या शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या ‘जागतिक आर्थिक परिषदेसाठी’ रवाना होत आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या पाच दिवसीय दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका करत गुंतवणुकीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये जागतिक कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांना पसंती देत असल्याची उदाहरणे दिली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डिस्ने’ आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील ‘हनीवेल’ यांनी विस्तारासाठी बंगळुरूची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले. डिस्नेने बंगळुरूमध्ये 1.74 लाख चौरस फूट, तर हनीवेलने 4 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. तसेच, डेलॉइटने मंगळुरूमध्ये 50 हजार नोकऱ्यांची घोषणा केली असून, मारुती सुझुकीने 35 हजार कोटींची गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राला जागतिक कंपन्यांची गुंतवणूक का मिळत नाही, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी सरकारच्या गुंतवणूक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावरचे सामंजस्य करार न करता प्रत्यक्ष उद्योग उभे राहावेत, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडताना मागील वर्षीच्या दावोस दौऱ्याचे यश अधोरेखित केले आहे. गेल्या वेळी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 72 टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे करार झाले होते आणि यंदाही तितकीच गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर