ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अजित पवार नाहीत, शरद पवारही अनुपस्थित; मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक:पोटनिवडणुकीत भावनिक क्षण; डोळ्यात अश्रू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असल्याचे सांगितले. मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्या क्षणी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक वर्षे बारामतीसाठी काम करणाऱ्या अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. या घटनेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक रंग अधिक गडद झाल्याचे दिसून आले. मतदानानंतर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीकर सकाळपासून मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. अजितदादांनी वर्षानुवर्षे मतदारसंघासाठी केलेल्या कामाची परतफेड लोक मतदानातून करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिकही असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. त्यांनी सांगितले की, दादांशिवाय कोणतेही काम करण्याची सवय नाही, मात्र आता वास्तव स्वीकारावे लागेल. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले. त्यांनी बारामतीकरांना आवाहन करताना, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करून आपला सहभाग नोंदवावा, असे म्हटले. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्रींचे वय 89 वर्षे असल्याने त्यांनी घरीच मतदान केले असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. मतदानासाठी जाण्यापूर्वी त्यांनी मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्याचेही सांगितले. या सर्व घडामोडींमुळे पोटनिवडणुकीला भावनिक रंग चढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. किती मताधिक्याने विजयी होणार, याकडे लक्ष दरम्यान, पार्थ पवार यांनीही काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेवर निवडीमुळे पार्थ पवार राज्यसभेत गेले आहेत. तसेच, अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे मतदान केंद्र परिसरात कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय दिसून आले. आता या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मताधिक्याने विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर