ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

संजय राऊत हे दुसरे अशोक खरात:सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने केली तुलना; स्वतःच्या पक्षाकडे पाहण्याचाही हाणला टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे भोंदू अशोक खरातसारखेच असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. अनिल पाटील यांनी केलेल्या या तुलनेमुळे राष्ट्रवादी व ठाकरे गटातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पारोळा, पाचोरा व मुक्ताईनगर येथील शिंदे गटातील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांची तुलना भोंदू अशोक खरातशी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात ज्या प्रकारे खोटे भविष्य सांगून लोकांची दिशाभूल करत होता. त्याचप्रमाणे संजय राऊत सध्या राजकीय भविष्यवाणी करत आहेत. त्यांची भविष्यवाणी ही खरातच्या भविष्यवाणीसारखीच भ्रामक आहे, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात सध्या संजय राऊत यांच्यासारखे नेते स्वतःला मोठे भविष्यकार समजत आहेत. पण त्यांनी इतर पक्षांविषयी अंदाज व्यक्त करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. सध्या त्यांच्याच पक्षातील अनेक आमदार व खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर स्वतःचे घर सांभाळावे व नंतर इतरांवर भाष्य करावे, असे ते म्हणाले. अनिल पाटील यांच्या या विधानावर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. परिणामी, पुढील काही दिवस राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. अंजली दमानियांना CMO ने माहिती पुरवली – संजय राऊत दुसरीकडे, संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच माहिती पुरवली जात असल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, अंजली दमानिया या रॉ (RAW) च्या प्रमुख नाहीत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे गुप्तहेर खातेही नाही. याचा अर्थ त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय मिळणार नाही. ही एवढी गुप्त माहिती आहे की, ती कोणताही व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. आता त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. ही एकूण परिस्थिती पाहता सरकारच्या टार्गेटवर कुणीही आहे हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नेम धरला आहे. तो नेम काय आहे? ते तुम्हाला कळेल. जेव्हा बाह्यशक्तीकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, ती जनतेपर्यंत पोहोचवली जाते, तेव्हा सरकारच्या निशाण्यावर स्वकीय टार्गेटवर आहेत असा त्याचा अर्थ होतो, असे संजय राऊत म्हणाले. हे ही वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर