ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

इतिहासात जिन्ना–हिंदू महासभेची युती:भाजप-एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू; दोघांची नैसर्गिक युती महाराष्ट्रासाठी घातक- हर्षवर्धन सपकाळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्मासाठी बाधक आहेत, त्यांनी फिक्स करत ही निवडणूक लढवली, यामुळे त्यांच्या दोघांची ताकद वाढलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. जिन्ना आणि हिंदू महासभेची युती होती. बंगालमध्ये मुस्लीम लीगचा मुख्यमंत्री, तर जनसंघाचे मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. ही दोघांची नैसर्गिक युती आहे, जी या निवडणुकीत समोर आली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता जर वेळीच सावध झाली नाही तर ही लोकं राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे औवेसी(एमआयएम) आणि देवेंद्र फडणवीस(भाजप) यांची जी मैत्री आहे एकाच विचाराने ते दोघे पुढे वाटचाल करत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. हा काय नवीन विषय नाही. वंचितसोबत सत्तेसाठी नाही विचारांसाठी युती हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेना गेली अनेक वर्षे मुंबई मनपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने वंचितसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.आमच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांची भावना आम्ही जाणून घेणार आहोत. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पण जय-पराजय नाही तर आमच्यासाठी विचारांचा मेळ आहे. गांधी-आंबेडकर पॅटर्नने आम्हाला पुढे जायचे आहे त्या दृष्टीने आम्ही युती केली. गायकवाड-जगताप यांच्यात समन्वय घडवणार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षांतर्गत आहे त्यावर कारवाई सुरू आहे. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत संघर्षावर लवकरच समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व काँग्रेस नेते एकत्रित काम करत आहोत. या टीम वर्कच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत पक्ष पुढे नेणार आहोत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर