ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘टोमॅटो देतो’ असे सांगून घरात बोलावले अन्…:7 वर्षांच्या चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, नागरिकांनी रंगेहाथ पकडून दिला चोप

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमध्ये एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळे कल्याण परिसर हादरून गेला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुमेया अली शेख (वय 50) असे या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने परिसरातीलच एका पीडित 7 वर्षीय चिमुरडीला ‘टोमॅटो देतो’ असे आमिष दाखवून फूस लावली. चिमुरडी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घरात गेली असता, घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नागरिकांनी रंगेहाथ पकडून दिला चोप दरम्यान, या भयंकर प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने आरोपीच्या घराकडे धाव घेतली. संतप्त नागरिकांनी आरोपी जुमेया अली शेख याला घरातच रंगेहाथ पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने नराधमाच्या तावडीतून या चिमुरडीची सुटका केली. चिमुरडीवर उपचार सुरू, आरोपीला अटक या भयंकर प्रसंगानंतर मानसिक आणि शारीरिक धक्का बसलेल्या पीडित चिमुरडीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी जुमेया अली शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर