ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

थकीत उसबिलासाठी धरणे आंदोलन सुरू:जकरायाच्या विरोधात जनहित संघटनेचा ठिय्या‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. मोहोळ तालुक्यातील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या गाळप हंगामात गाळप गेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल १५०० रुपयां प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होते.मात्र उर्वरित ५० टक्के थकीत बिल प्रति टन नियमा प्रमाणे ३ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असताना कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बिलाची संदर्भात गांभीर्याने दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.या संदर्भात तात्काळ प्रशासनाने संबंधित कारखान्याला पत्रव्यवहार करून राहिलेले शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी भाग पाडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला आहे . यावेळी बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर