ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

फडणवीसांचे आर्थिक दावे खोटे:राज्यावरील कर्ज 4 पटीने वाढले; परकीय गुंतवणुकीच्या करारांवर महायुती सरकारने ‘श्वेतपत्रिका’ काढावी- गोपाळ तिवारी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत केलेले दावे खोटे आणि तथ्यहीन असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. 2014 च्या तुलनेत देश आणि राज्यावरील कर्ज चार पटीने वाढले असताना, सरकारने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचे तिवारी म्हणाले. तिवारी यांनी महायुती सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. दावोस परिषद आणि इतर माध्यमातून परकीय गुंतवणुकीचे करार प्रत्यक्षात आले असतील, तर सरकारने यावर तातडीने ‘श्वेतपत्रिका’ (White Paper) काढावी, असे ते म्हणाले. तसेच, राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आणि गुंतवणुकीचा दावा खरा असेल, तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आकडेवारी जाहीरपणे मांडावी, असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ तिवारी यांनी मोदी सरकारच्या काळातील आर्थिक तज्ज्ञांचे दाखले दिले. आयएमएफचे माजी कार्यकारी संचालक आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी सदस्य सुरजीत भल्ला, तसेच नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारीया यांनीही भारताच्या ‘सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’ या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असे त्यांनी नमूद केले. देशातील वाढती महागाई, इराण-रशिया तणावामुळे उद्भवलेले तेल व गॅसचे संकट आणि आर्थिक कोंडी यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नेते ‘सब कुछ चंगा’ (सर्व काही आलबेल) असल्याचे भ्रामक चित्र रंगवत असल्याचा घणाघात तिवारी यांनी केला. अमेरिकन डॉलरमधील दरडोई जीडीपी वाढीच्या बाबतीत भारत आज बांगलादेश आणि इथिओपियासारख्या देशांच्याही मागे फेकला गेला आहे, ही अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचे तिवारी म्हणाले. अर्थतज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था नवव्या क्रमांकावर असताना, भाजप नेते ती पाचव्या क्रमांकावर असल्याचा खोटा दावा का करत आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर