महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची विनंती केली आहे. सूत्रांनुसार, पत्र पाठवणाऱ्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावत म्हटले आहे की, “मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा खासदार आहे आणि पक्षातच राहीन.” दरम्यान, शिवसेनेचे (यूबीटी) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बंडखोर खासदारांना शिवीगाळ केली. राऊत शिवीगाळ करताना म्हणाले, “हे बेईमान लोक आहेत. बेईमानी त्यांच्या रक्तात आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना भावासारखे वागवले आणि हे *भX#U* लोक, मी बोललेलं कट करू नका,” असेही म्हणाले. ते नंतर माध्यमांना म्हणाले. “असे शब्द मराठीत सर्रास बोलले जातात.” सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांनी या गटाला प्राथमिक मान्यता दिल्यानंतर उद्धवसेना नेतृत्वात खळबळ उडाली आहे. या घडामोडींची माहिती मिळताच खासदार संजय राऊत यांनी तातडीने संसद भवनात धाव घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची 20 मिनिटे भेट घेतली आहे. या बैठकीत त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत व अनिल देसाईही सोबत होते. ठाकरे गटाची बाजू ऐकून घ्यावी, राऊतांची मागणी ठाकरे गटाने यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्र देत कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देण्यापूर्वी पक्षाची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली होती. संसदीय पक्षनेते अरविंद सावंत यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या पत्रात, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील अधिकृत पक्ष मानला जावा आणि कोणत्याही फुटीर गटाला विशेष दर्जा किंवा मान्यता देऊ नये,” अशी विनंती करण्यात आली होती. आता सहा खासदारांच्या गटाला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत स्वतः लोकसभा अध्यक्षांकडे उद्धवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे समजते. संजय राऊतांची दिल्लीत पत्रकार परिषद…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला. रात्री 11 वाजता फोन आला, 50 कोटींची डील उघड.. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी ५० कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली,” असे राऊत म्हणाले. कोणी साईबाबांची, तर कोणी आई-मुलाची शपथ घेतली.. खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी १४ जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा किस्सा सांगितला. राऊत म्हणाले, आमची १४ तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसऱ्याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही. ओमराजे निंबाळकरांवर खटल्याच्या निकालासाठी दबाव…. संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकसभा अध्यक्षांनी संविधानाचे पालन करत निर्णय घेतला पाहिजे. जो त्यांनी यापूर्वी घेतला नाही. खासदारांवर दबाव कशा प्रकारे येतात हे मी तुम्हाला सांगतो, 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांची हत्या झाली. गेली 20 वर्षे तो खटला सुरू आहे, काल त्यांचा निकाल होता, मुंबई हायकोर्टात पण ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकण्यात आला की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात सामील व्हा. संजय राऊत म्हणाले की, खून प्रकरणचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर तुम्ही या लेटरवर सही करा आणि आमच्यासोबत या. जर देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था या पद्धतीने चालत असेल तर तर काय संविधान आणि काय न्यायव्यवस्था त्यामुळेच या प्रकरणाचा निकाल दोन दिवस पुढे ढकलला गेला. येथे वाचा संपूर्ण बातमी हे सर्व खासदार मशाल’ चिन्हावर निवडून आले हे सर्व खासदार ‘मशाल’ चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही. “ज्यांना आता जायचे असेल त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग जावे,” असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, पक्षाने सर्व खासदारांसाठी अधिकृत ‘व्हीप’ जारी केला असून, दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने तातडीने अधिकृत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. वर्धापन दिनापूर्वी सुरू असलेल्या या हायव्होल्टेज राजकीय नाटकामुळे महाराष्ट्राचे राजकारण आता टोकाला पोहोचले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी ठाकरे सेनेकडून खासदारांना व्हीप जारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य खासदार फुटीच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना पक्ष नेतृत्वाने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी सर्व लोकसभा खासदारांना उपस्थित राहण्याचा अधिकृत व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षातील ६ ते ७ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान हा निर्णय घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव सेनेसमोर नवीन संकट; ९ पैकी ६ खासदार वेगळ्या वाटेवर? लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ६ खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश सदस्य वेगळे झाले तर स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकते. त्यामुळे ९ पैकी किमान ६ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास या गटाला कायदेशीर वैधता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या खासदारांचा वेगळा गट होण्याची चर्चा… यांच्यासह काही खासदारांनी स्वतंत्र गटासाठी सहमती दर्शवली आहे. त्यापैकी काही खासदार आधीच दिल्लीत दाखल झाले असून उर्वरितही राजधानीत पोहोचले आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी राऊत-अरविंद सावंत दिल्लीत या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनीही दिल्ली गाठली आहे. फुटीची शक्यता रोखण्यासाठी ते नाराज खासदारांशी संपर्क साधत असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर थेट आरोप करत, “खासदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे,” असा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षांतरबंदी कायद्यातील गणित महत्त्वाचे लोकसभेत उद्धव सेनेचे ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गटाला मान्यता मिळवण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता असते. म्हणजेच किमान ६ खासदार एकत्र आल्यास स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या हालचालींना केवळ राजकीय नव्हे तर कायदेशीर महत्त्वही प्राप्त झाले आहे. तथापि, स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर पुढील टप्प्यात त्यांना अन्य पक्षात विलीन व्हावे लागू शकते, असे संसदीय तज्ज्ञांचे मत आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान लाइव्ह अपडेट्ससाठी खालील ब्लॉग वाचा…
