ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी!:पृथ्वीराज मोहोळने दुखापतीनंतर घेतली माघार; कुस्तीच्या आखाड्यात नेमके काय घडले? वाचा सविस्तर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 52 व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत वाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत पार पडणार होती. मात्र, कुस्ती सुरू झाल्यानंतर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने डाव टाकला तेव्हा पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. त्याला हात हलवताही येत नसल्याने त्याने माघार घेतली. त्यानंतर बाहुबली म्हणून नावलौकिक असलेला महेंद्र गायकवाड हिंद केसरीचा मानकरी ठरला. तीनवेळा उपमहाराष्ट्र केसरी राहिलेला महेंद्र गायकवाड अखेर देशाचा 39 वा आणि महाराष्ट्राचा 10 वा हिंदकेसरी ठरला आहे. यंदा अंतिम फेरीत दोन्ही पैलवान महाराष्ट्राचेच आमनेसामने असल्याने ही मानाची गदा राज्यातच येणार हे आधीच निश्चित झाले होते. मात्र सामन्यादरम्यान झालेल्या प्रकारामुळे कुस्तीशौकिनांना हवी तशी लढत पाहायला न मिळाल्याने त्यांची काहीशी निराशा झाली. अखेर विजयी घोषित होताच महेंद्रला आपले अश्रू अनावर झाले आणि या ऐतिहासिक विजेतेपदासह त्याने मानाची हिंदकेसरी गदा व एक थार गाडी आपल्या नावावर केली. नेमका वाद काय झाला? हिंदकेसरीच्या अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पृथ्वीराज मोहोळवर चढाई केली आणि सुरुवातीलाच दोन गुणांची कमाई केली. पृथ्वीराज खाली असताना महेंद्रने त्याचा उजवा हात पकडून डाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण याच दरम्यान पृथ्वीराजचा हात उलटा फिरल्याने सामन्यात आक्षेप घेतला गेला आणि कुस्ती थांबवण्यात आली. विशेष म्हणजे, इतकी मोठी दुखापत झाली असतानाही पृथ्वीराज जिद्दीने पुन्हा लढण्यासाठी तयार झाला होता, मात्र त्याचा हात अजिबातच हलत नसल्याने वैद्यकीय कारणास्तव कुस्ती थांबवून अखेर महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले. महेंद्र गायकवाडच्या विजायवर संमिश्र प्रतिक्रिया तीनवेळा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या महेंद्रने यंदा फायनल गाठेपर्यंत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्यासह अनेक नामवंत आणि दिग्गज पैलवानांना पराभूत केले होते. मात्र, अंतिम लढतीत घडलेल्या त्या अनपेक्षित प्रकारानंतर आता कुस्ती वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, झालेल्या वादावरून अनेकांनी महेंद्रवर थेट टीकाही केली आहे. 28 राज्यांतील कुस्तीपटूंचा होता सहभाग भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत देशभरातील 28 राज्यांतील सुमारे 850 महिला व पुरुष मल्ल सहभागी झाले होते. या स्पर्धेत दोन्ही गटांत अत्यंत चुरशीच्या महालढती पार पडल्या, ज्यात महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांनी उपांत्य फेरीत उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व मोडून काढत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर