ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ॲक्वामित्र द्रावणाच्या संशोधनाला केंद्राचे पेटंट:हिंगोलीच्या युवा संशोधक पुष्यमित्र जोशीचा सन्मान; यापूर्वी दोन संशोधनाला मिळाले पेटंट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोलीचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त संशोधक पुष्यमित्र जोशीला त्याच्या ॲक्वामित्र द्रावण या संशोधनाला केंद्र सरकारचे पेटंट मिळाले असून याबाबतचे पत्र त्याला नुकतेच देण्यात आले आहे. त्याच्या संशोधनासाठी हे तिसरे पेटंट प्राप्त झाले आहे. ॲक्वामित्र द्रावणातून पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी करणारे द्रावण त्याने तयार केले आहे. भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. हाडे ठिसुळ होणे, किडणी विकारासह किडनीस्टोन व इतर गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे देशभरात पाण्याच्या स्त्रोतांची वेळोवेळी तपासणी करून फ्लुराईडचे प्रमाण अधिक असलेले पाणीस्त्रोत बंद केले जातात. त्या स्त्रोताच्या परिसरात पाणी पिण्यास अयोग्य असा फलकही लावला जात आहे. दरम्यान, देशभरातील या समस्येवर उपाय म्हणून नवीन संशोधन करण्याचा निर्णय पुष्यमित्र याने घेतला होता. त्यानुसार त्याने विविध प्रयोग करून त्यातून ॲक्वामित्र हे द्रावण तयार केले. फ्लुराईडचे प्रमाण जास्त असलेल्या पाण्यात हे द्रावण मिसळल्यास फ्लुराईडचे प्रमाण कमी होऊन पाणीस्त्रोत पिण्यायोग्य होतात. कुठल्याही प्रकारच्या उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी होत असल्याने अत्यंत कमी खर्चीक आहे. यामुळे दुर्गम भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. सदरील ॲक्वामित्र द्रावण पेटंटसाठी केंद्र शासनाच्या पेटेंट कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर पेटंेंट कार्यालयाने त्यास मंजूरी देऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र ता. १६ मार्च रोजी पुष्यमित्र यास पाठविले आहे. याआधी पुष्यमित्रच्या डिस्पोजमित्र व मोल्युस्क कॅचर या दोन उपकरणानांही पेटंट मिळाले आहे. पुष्यमित्राचे डिस्पोजमित्र उपकरण हे जैव वैद्यकीय कचऱ्याचे इको फ्रेंडली पद्धतीने विघटन करते तर मोल्युस्क कॅचर मासेमारी करणाऱ्यांसाठी उपयोगी ठरते. ब्रिक्स अंतरराष्ट्रीय संघटनेत दोनवेळा भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या पुष्यमित्र यास राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. कोविड-१९ च्या काळात, त्याने डिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली आणि सॅनिटायझरची बाजारात कमतरता असताना त्याने स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले होते. पुष्यमित्र जोशी याने विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यावर तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत, जी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर लेख देखील प्रसिद्ध आहेत. जी २० जागृती यात्रेत ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. पुष्यमित्र जोशीला पूर्णवाद युथ फॉर्मद्वारे प्रतिष्ठित युथ आयकॉन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या यशाबद्दल हिंगोलीकरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर