ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अन्नाच्या शोधात आलेल्या चितळाचा दुर्दैवी अंत:लाखांदूर शहरातील घटना; वन विभागाने केली योग्य ती कारवाई

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जंगलातील अन्नाचा शोध घेत मानवी वस्तीत शिरलेल्या एका निष्पाप चितळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज शनिवारी (ता.२४) लाखांदूर शहरात घडली. निसर्गाच्या साखळीतील हा सुंदर प्राणी अन्नाच्या शोधात थेट शहरात पोहोचला, मात्र त्याचे नशीब बलवत्तर नव्हते. शनिवारला सकाळी ११ वाजेच्या सुमारास लाखांदूर शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये ही घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक रहिवासी मुक्ताबाई रमेश देसाई यांच्या घरासमोरील अंगणात एक चितळ मृतावस्थेत पडून असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. भर वस्तीत चितळ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी विलंब न करता लाखांदूर वन विभागाला पाचारण केले. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत चितळाचा पंचनामा करून देह ताब्यात घेतला आणि पुढील प्रक्रियेसाठी वन विभागाच्या कार्यालयात नेले. या प्रकरणाचा सखोल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चितळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तो नैसर्गिक आहे की अन्य काही कारणाने, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. शहरात वन्यप्राणी आल्याची आणि त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मृत चितळाला पाहण्यासाठी वॉर्ड क्रमांक १२ मध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अन्नाच्या शोधात या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर