ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अजित पवार 4 वर्षांची सत्ता सोडणार नाहीत:काँग्रेसने अजित पवार MVA मध्ये परतणार असल्याचा संजय राऊतांचा दावा फेटाळला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीत येणार असल्याचा संजय राऊत यांचा दावा फेटाळला आहे. अजित पवार 4 वर्षांची सत्ता सोडून पुन्हा महाविकास आघाडीत परततील असे वाटत नाही, असे ते म्हणालेत. महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत दिसतील असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे. अजित पवार 4 वर्षांची सत्ता सोडतील असे वाटत नाही सतेज पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याकडे सध्या अत्यंत महत्त्वाचे अर्थ खाते आहे. त्यांना सत्तेचा खरा अर्थ समजलेला आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय अनुभव पाहता ते सत्तेपासून दूर जातील असे मला वाटत नाही. पण तसे झाले तर स्वागतच असेल. अजित पवार महाविकास आघाडीत आले तर मविआ आणखी मजबूत होईल. पण अजून 4 वर्षे सत्ता बाकी आहे. ही 4 वर्षांची सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता अजित पवारांची असेल असे मला वाटत नाही. पण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने त्यांचा केलेला अपमान व त्यांच्याविषयी केलेली विधाने पाहता स्वाभिमानी अजित पवारांनी निर्णय घ्यायला काही हरकत नाही. आत्ता पाहू काय म्हणाले होते संजय राऊत? संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत परततील असा दावा केला. ते म्हणाले, मी असा विचार करतो की, शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. कारण, शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. त्याचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. याऊलट अजित पवार महायुतीत आहेत. त्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावलेला आहे. अशा वेळी त्यांच्यावर तिथे कारवाई होईल. मला अशी खात्री आहे की, भविष्यात शरद पवार व अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र दिसतील. पत्रकारांनी यावेळी संजय राऊतांना अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील का? असा थेट प्रश्न केला. त्यावर राऊत म्हणाले, त्यांना बाहेर पडावेच लागेल. एकाचवेळी दोन दगडांवर पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावे लागेल किंवा काहीतरी एक स्वीकारावे लागेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर