ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

हिंगोलीत इंधनाचा खडखडाट:एका बाजूला फलक, दुसऱ्या बाजूला ‘कॅन’मधून छुप्या पद्धतीने डिझेल विक्री, नियमांना केराची टोपली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यात इंधनासाठी मारामारी होत असतांना एकीकडे कॅनमध्ये इंधन मिळणार नाही असा फलक लाऊन त्याच पंपावर चक्क कॅममध्ये भरून इंधन दिले जात असल्याचा प्रकार होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पंप चालकांचा हा उद्दामपणा असल्याचे बोलले जात आहे.त्यातही आपले नेहमीचे गिऱ्हाईक सांभाळण्यासाठी काही पंप चालकांकडून आटापीटा केला जात असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हयातील 86 पेट्रोलपंपावर दररोज किमान 2 लाख लिटर डिझेल आवश्‍यक असते. मात्र सध्याच्या स्थितीत डिझेलची मागणी वाढल्याने तीन लाख लिटर डिझेल लागत आहे. त्यामुळे एक लाख लिटरची तुट कशी भरून काढावी असा प्रश्‍न प्रशासना समोर उभा राहिला आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून हाणामाऱ्या होत आहेत. सेनगाव तालुक्यातील एका पंपावर हाणामारी झाली त्यानंतर शनिवारी ता. 22 रात्री कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटा येथील पंपावर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सेनगाव पोलिस ठाण्यात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम फक्त कागदावर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेट्रोल पंप चालकांना कॅनमध्ये इंधन देऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या. या शिवाय त्याबाबतचे फलक देखील लावण्यात आले आहे. त्यानुसार पेट्रोलपंप चालकांनी फलक देखील लावले आहेत. मात्र काही पेट्रोलपंप चालकांनी एकीकडे फलक लाऊन दुसरीकडे कॅनमध्ये डिझेल विक्री सुरु केल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार केला जात असल्याने आता प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.. या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर