ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या
कळंब येथील दुर्दैवी घटना

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

परिसरात हळहळ; पोलिसांकडून तपास सुरू

कळंब | प्रतिनिधी : नितेश क्षीरसागर

कळंब शहरात एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

हेमंत पंडितराव येंगडे (वय २२, रा. वॉर्ड क्रमांक ३, कळंब) असे मृत युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर युवकाने आपल्या राहत्या घरासमोरील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ कळंब पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने युवकास विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, कळंब येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कळंब परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत युवकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मृत युवकाच्या पश्चात आई व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर